Monday, January 21, 2019

अनाधिकृत जाहिरात फलकावर कार्यवाही करण्यासाठी समिती गठीत
            परभणी, दि. 21 :- अनाधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग्ज, पोस्टर्सबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्र वगळता अन्य क्षेत्राकरीता डिफेसमेंट अॅक्ट 1995 मधील तरतुदीची अंमलबजावणीकरण्यासाठी परभणी जिल्ह्यातील तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून तहसीलदार यांना नोडल ऑफीसर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
            तालुक्यात प्राप्त होणाऱ्या अनाधिकृत जाहिराती, घोषणाफलक, होर्डिग्ज, पोस्टर्सबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने तालुकास्तरीय समितीत नोडल अधिकारी तथा समिती प्रमुख म्हणून नायब तहसीलदार महसूल 1 परभणी तसेच सदस्य परभणी पंचायत समिती गटविकास अधिकारी  आणि नवा मोंढा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षात  नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून तहसीलदार (महसूल-1) अनिल घनसावंत यांची तर सहाय्यक म्हणून अव्वल कारकुन विष्णु पकवाने, लिपिक राम जोशी यांची नेमणूक करण्यात आली असून नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्र.02452-222711 असा आहे. नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी हे अनाधिकृत जाहिराती घोषण फलक, होर्डिग्ज, पोस्टर्सबाबत या कार्यालयातील आवक विभागातून व दुरध्वनीद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारीची नोंद रजिस्टरमध्ये करुन त्यावर नियमानूसार कार्यवाही करुन करणार आहेत. असे तहसीलदार, परभणी यांनी आदेशात नमुद केले आहे.
-*-*-*-*-

जिल्ह्यात बाल महोत्सव उत्साहात संपन्न
            परभणी, दि. 21 :- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी परभणी व बाल कल्याण समिती परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल महोत्सवाचे उदघाटन राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या श्रीमती शालिनी कराड यांच्या हस्ते दि.17 जानेवारी 2019 रोजी बी.रघुनाथ सभागृह परभणी येथे झाले.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती सुर्यवंशी या होत्या तर कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सुकेशिनी पगारे, महापालिका उपायुक्त विद्या गायकवाड, हिंगोलीचे जिल्हा कामगार अधिकारी टी.ई.कराड,चाइल्ड लाईनचे संदिप बेंडसुरे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती रुपाली रंगारी यांनी केले. यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष ॲङसंजय केकाण यांनी मनोगत व्यक्त केले. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-

निवृत्तीवेतन धारकांनी जन्म तारखेची नोंद असलेले पुरावे सादर करावेत
            परभणी, दि. 21 :- परभणी जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन धारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी सातव्या वेतन आयोगानूसार वयोमानानूसार वाढीव निवृत्तीवेतन देण्यासाठी निवृत्तीवेन प्रणालीमध्ये 80 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांची जन्म तारखांची माहिती अद्यावत करण्यात येत असून जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये जन्म तारखेची नोंद असलेले आधार, पॅन, जन्माचा दाखला, पासपोर्ट, सेवा पुस्तकाची जन्म तारखेची नोंद असलेली प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, वय राष्ट्रीयत्व अधिवास प्रमाणपत्र, वाहनचालक परवान्याची प्रत  सादर करावी. असे जिल्हा कोषागार अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-

Saturday, January 19, 2019

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी            परभणी, दि. 19 :- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी  जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये परभणी जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या हद्दीत दि. 16  जानेवारी 2019 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून ते दि. 31 जानेवारी   2019 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.     
या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश धार्मिक सभा, अंत्ययात्रा, विवाह, अधिकारी- कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
-*-*-*-*-

प्रजासत्ताक दिन व महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कत्तलखाने बंद ठेवण्याचे आवाहन
   परभणी, दि. 19 :-  शहरातील सर्व कसाब, बकरा कसाब यांनी दि.26 जानेवारी 2019 रोजी प्रजासत्ताक दिन आणि दि.30 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती (क), परभणी शहर महानगरपालिका, परभणी यांनी केले आहे.
-*-*-*-*-

Friday, January 18, 2019

बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांचा परभणी जिल्हा दौरा
            परभणी, दि.18 :- महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
            रविवार दि.20 जानेवारी 2019 रोजी सकाळी 7.10 वाजता परभणी रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव. सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह परभणी येथून माजलगावकडे प्रयाण करतील.
-*-*-*-*-